MIM ही भाजपची B टीम, युतीचा प्रश्नच नाही; मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव धुडकावला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम ही भाजपची बी टीम आहे त्यामुळे त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच नाही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. आज शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवरून भाजपला घेरण्याचाही प्रयत्न केला.

एमआयएम सोबत युती नाहीच. शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. भाजपचं हिंदुत्व राजकारणासाठी आहे. आपलं हिंदुत्व हे देशाच्या हिताचं आहे. काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत युती केली होती, याचा भाजपला विसर पडला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

येत्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र दौरा करण्याचे संकेत दिले आहेत. आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं. यावेळी त्यांनी जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार राहा असं आवाहन केलं.

Leave a Comment