गर्दी टाळली नाही, तर दुसरीच लाट उलटू शकते; मुख्यमंत्र्यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा धोका अद्याप टळला नसून आपण गर्दी टाळली नाही, तर दुसरीच लाट उलटू शकते, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. मालाड येथील कोविड केअर सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.

औषधाची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता अशी तारेवरची कसरत करत दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, अद्यापही दुसरी लाट संपली नाही. त्यातच डेल्टा प्लस या नव्या करोना विषाणुमुळे तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेचा विषाणू डेल्टा आहे. आणि आता डेल्टा प्लस आढळून आला आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटल.

डेल्टा प्लसने अजून रंग दाखवलेले नाहीत. पण, डेल्टाच अजूनही राज्यात आहे. जर गर्दी टाळली नाही तर दुसरी लाटच उलटू शकते, ओसरु नाही शकत तर उलटू शकते. त्यामुळेच, आजपासून आपण जे केलंय त्याचं महत्त्व नागरिकांच्या लक्षात येईल.

Leave a Comment