पंतप्रधान मोदींच्या ‘या’ घोषणेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून स्वागत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशावासियांना मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. यामुळे ८० कोटी नागरिकांना ५ किलो गहू किंवा ५ किलो तांदूळ तसेच १ किलो चणा डाळ प्रतिमाह मोफत मिळणार आहे. या घोषणेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत ट्विट केलं आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं कि, ”प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, त्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी व्हिसीमध्ये पंतप्रधानांना या योजनेस मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. या योजनेत तांदूळ आणि चणा डाळ देण्यात येत असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सुमारे ७ कोटी लोकांना याचा लाभ होणार असेही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले.”

आज पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करत असताना याची घोषणा केली. त्यांनी म्हटलं की, ‘एक मोठी गोष्ट अशी आहे ज्यामुळे जग देखील हैराण आहे. ती म्हणजे, कोरोनासोबत लढताना ८० कोटीपेक्षा अधिक लोकांना राशन मोफत दिलं गेलं आहे. वर्षाऋतू दरम्यान आणि त्यानंतर कृषी क्षेत्रात जास्त काम होतं. इतर क्षेत्रात थोडी सुस्ती असते. जुलैपासून सणांचं वातावरण देखील सुरु होतं. त्यामुळे खर्च देखील वाढतो. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार दिवाळी आणि छटपुजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत केला जाईल. नोंव्हेंबर पर्यंत मोफत राशन दिलं जाईल. ८० कोटीहून अधिक लोकांना ५ किलो गहू किंवा तांदुळ मोफत दिलं जाईल. सोबतच एक किलो चणा देखील दिलं जाईल.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment