हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्बेत गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याने ते घरीच आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजप सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे याना विचारले असता त्यांनी विरोधकांना फटकारत मुख्यमंत्री लवकरच ऍक्शन मोड मध्ये येतील असे म्हंटल आहे
आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले टीका करणे हे विरोधकानाचे कामच आहे.आपण विरोधाकांकडे लक्ष न देता काम करत राहावे. जनता मुख्यमंत्र्यांसोबत आणि आमच्या सोबत ठामपणे उभी आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत एकदम ठीक आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांना ऍक्शनमध्ये पाहू, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
दरम्यान आज सकाळीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या मुख्यमंत्र्यांच्या तब्बेती वरून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा समाचार घेतला होता. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तब्येत अत्यंत उत्तम आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांना त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटत आहे, त्याच्याविषयी ते काहीतरी वक्तव्यं करत असतात. हे विरोधी पक्षाच्या बिघडलेल्या प्रकृतीचं लक्षण आहे”.असा टोला संजय राऊत यांनी लगावला.