सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भूमिका रक्षकाची नसून भक्षकाची : राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांचा वारस सांगत बाळासाहेब पाटील सहकारमंत्री झाले. सहकार मंत्र्याचे कर्तव्य, जबाबदारी आहे, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे मिळणारे संरक्षण मिळते की नाही बघणे. अशी रक्षकाची भूमिका बाळासाहेब पाटील यांची असताना भक्षकासारखे वागतात, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.

कराड येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्यासह स्वाभिमानी व बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राजू शेट्टी म्हणाले, आजही आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन व्हावे. राज्यात अनेक कारखाने एकरकमी एफआरपी देत असताना, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनाच काय अडचण आहे हे त्यांना स्पष्ट करावे लागेल. साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या घरावर दरोडे टाकणार असतील. शेतकऱ्यांची परिस्थिती बघा एका बाजूला महापूर, अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेले आहे. महाविकास सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अवघे 150 रूपये गुंठ्याला मदत दिली आहे. लाखो रूपयांचा ऊस महापूरात बुडून गेला आहे. साखरेला भाव वाढवून मिळाला आहे. बाळासाहेब पाटील आपणाकडे उत्पान्नाची अतिरिक्त साधने आहेत. सरकारने अडमुठी भूमिका घेतील तर 2013 चा इतिहासाची पुनरावृत्ती केली जाईल. तेव्हा एकरकमी एफआरपी द्यावी.

सहकारमंत्र्याच्या हस्तक्षेपामुळेच ऊसदर बैठक बरखास्त : राजू शेट्टी

आज स्वतः राज्याचे सहकारमंत्री म्हणतात की एकरकमी एफआरपी देणे शक्य नाही. तेव्हा तुम्ही राज्याचे सहकार मंत्री आहात की सह्याद्रीचे चेअरमन आहात ते सांगावे. राज्याचा सहकार मंत्री कायद्यातील तरतुदीची अमंलबजावणी करणे हे तुमचे कर्तव्य आहात. सातारा येथे जिल्हाधिकारी यांनी ऊस दरा संदर्भात बैठक बोलाविली होती. ती बैठक बरखास्त झाली, त्यामध्ये बाळासाहेबांचाच हात असू शकतो. त्यामुळे त्याच्या प्रतिक्रिया आजपासून उमठल्याशिवाय राहणार नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावे.

Leave a Comment