उंडाळे भागातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सहकार पॅनेलने मार्गी लावला : डॉ. सुरेश भोसले

उंडाळेत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलची प्रचारसभा

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील उंडाळे विभागात जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने गुरुवारी उंडाळे विभागातील सभासदांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी कृष्णा कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी भाषण केले. ते पुढे म्हणाले, “उंडाळे भागातील शेतकरी सभासदांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले. शेतकरी सभासदांच्या मागणीनुसार कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून वाकुर्डे योजनेची थकीत वीजबिलाची एकूण १५ लाख ८० हजार रुपये इतकी रक्कम भरण्यात आली.

उंडाळे येथील कार्यक्रमप्रसंगी सहकार पॅनेलचे उमेदवार दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, संचालक पांडुरंग होनमाने, माजी संचालक श्रीरंग देसाई यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. यावेळी सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर करताना पंजाबराव पाटील म्हणाले, डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या अथक प्रयत्नातून कृष्णा कारखाना चांगल्या पद्धतीने चालविला आहे. ऊसाला चांगला दर देऊन शेतकऱ्यांचे हित साधले असून, सभासदांनी सहकार पॅनेलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे.

येत्या काळातही या भागातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार पॅनेलच्यावतीने विशेष प्रयत्न केले जातील.”गेल्या सहा वर्षात आम्ही शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिला आहे. सरासरी हा दर ३००० रुपये इतका आहे. आम्ही पारदर्शक व नियोजनबद्ध असा कारभार केला. कारखान्याची गाळप क्षमता ९००० मे. टनावरून १२,००० मेट्रिक टन वाढविण्याचा आमचा मानस आहे. जयवंत आदर्श योजना अधिकाधिक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.