पालेभाज्या कडाडल्या तर इतर भाज्या आवाक्यात; काय आहेत आजचे भाव जाणून घ्या सविस्तर

औरंगाबाद | मान्सूनच्या पावसाने दांडी मारल्याने बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटली आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये भाज्यांचे भाव कमी होतात मात्र पाऊस नसल्याकारणाने पालेभाज्यांचा भाव काढल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी शहरातील विविध भागात भाजीमंडीतील पालेभाज्यांचे भाव चढलेले दिसून आले.

पाच रुपयाला मिळणारी भाजीची जुडी आता पंधरा ते वीस रुपयाला झाल्याने नागरिकांच्या ताटातील पालेभाजी गायब झालेली पाहायला मिळत आहे. जून महिना संपत आला तरी अद्याप मान्सूनचा पाऊस बरसला नाही त्यामुळे इतर जिल्ह्यातून औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी भाजीपाल्याची आवक घटली आहे. याचा परिणाम भाजी मार्केट मध्ये दिसून येत आहे.

टोमॅटो, बटाटे, कांदे, गोबी, फुल गोबी याचे दर आवाक्यात असले तरी गवार शेवगा प्रतिकिलो 100 रुपये पर्यंत वाढला आहे. वांगे दोडके प्रति किलो 70 रुपये पर्यंत वाढले आहेत तर भेंडी कारली शिमला मिरची 60 रुपये प्रति किलो आहे. मुख्य म्हणजे महिनाभरापूर्वीच मेथी पालक कोथिंबीरची एक जुडी तीन ते पाच रुपयांना मिळत होती तेच आता मेथीची एक जुडी 15 रुपये पर्यंत वाढवली आहे पालक, शेपू जुडी दहा ते बारा रुपयांना मिळत आहे तर कोथिंबीरीच्या जुडीचे दरही पंधरा रुपयापर्यंत वाढल्याचे भाजीपाला विक्रेते सागर पुंड यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना माहिती दिली.

भाजीपाल्यांचा आजचा बाजार भाव :

कांदे – 30, बटाटे – 20, टमाटे – 20, वांगे – 70, दोडका तुरई – 80, दिल पसंद – 60, फुल गोबी – 60, पत्ता गोबी – 40, शिमला मिरची – 60, मेथी – 15/20,पालक – 15, कोथंबीर – 12/ 15, कांद्याची पात -10, शेपू – 15, भेंडी – 50, गाजर – 50/60, लसुन – 120, अद्रक – 40, काकडी – 30, गवार – 60, शेवगा – 100, कारले – 50, भोपळा – 40, कोथिंबीर – 15