नाशिकमध्ये तरुण – तरुणींमध्ये तुफान राडा; कॉलेजबाहेर विद्यार्थ्यावर करण्यात आले सपासप वार

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांत नाशकात गुन्हेगारीच्या घंटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नाशिक शहरातील वावरेनगर याठिकाणी एका महाविद्यालयीन तरुणावर काही जणांनी सशस्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. महाविद्यालयाच्या परिसरात हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक शहराच्या वावरेनगर परिसरातील एका महाविद्यालयात काही तरुण-तरुणींमध्ये तुफान हाणामारी झाली याच भांडणातून काही जणांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे.

हि घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामध्ये काही कॉलेज तरुण आणि तरुणी जखमी विद्यार्थ्याला घेऊन पळताना दिसत आहेत. तरुणावर हल्ला झाल्यानंतर, पुन्हा हल्ला होईल या भीतीने संबंधित तरुण-तरुणी धावपळ करत आहे.

या महाविद्यालयीन तरुण-तरुणीमध्ये नेमक्या कोणत्या कारणातून वाद झाला? हे अजून समजू शकले नाही. या व्हायरल व्हिडिओमध्ये जखमी मुलगा आपल्या मित्र-मैत्रिणीसह पळताना दिसत आहे. महाविद्यालयाच्या आवारात अशाप्रकारे जीवघेणा हल्ला झाल्याने कॉलेजच्या बाकी तरुणांमध्ये मोठ्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

You might also like