आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून रूग्णवाहिका कराडकरांच्या सेवेत

अखेर वर्षभर पडून ठेवलेला निधी पालिकेने सत्कार्मी लावला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आमदार निधीतून कराड नगरपरिषदेस उपलब्ध झालेल्या रूग्णवाहिकेचे आज लोकार्पण करण्यात आला. गेल्या वर्षी कोरोना काळात रूग्णवाहिकेसाठी पालिकेस निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र वर्षभर निधी पडून होता अखेर दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याशी संपर्क साधला होता. अखेर वर्षभर पडून असलेल्या आ. चव्हाण यांच्या निधीतून पालिकेने रूग्णवाहिका खरेदी केली असून पूजन आ.चव्हाण यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित रूग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले.

नगपालिकेत रुग्णवाहिकेचे पूजन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, माजी नगराध्याक्षा, नगरसेविका शारदा जाधव, माजी नगरसेवक अशोक पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, नगरसेवक फारूख पटवेकर, इंद्रजित गुजर, राजेंद्र माने, विनायक पावसकर, सुहास जगताप, राजेंद्र कांबळे, साैरभ पाटील, विद्या पावसकर यांच्यासह पालिकेचे सदस्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गतवर्षी कोरोना काळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड नगरपालिकेला रुग्णवाहिकेसाठी सुमारे पंधरा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र नगरपालिकेकडून पुढील काळात याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती, नुकत्याच झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत यावर चर्चाही झाली होती. त्यानंतर माध्यमांनी आमदार चव्हाण यांना याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी जर पालिकेला रुग्णवाहिकेसाठी साठी दिलेला निधी नको असेल तर तसे त्यांनी कळवावे, त्यामूळे संबधित निधी अन्य कामासाठी वापरता येईल असे सुनावले होते.

गतवर्षी कोरोना काळात आ.चव्हाण यांनी त्यांच्या आमदार निधीतून कराड व मलकापूर शहरासाठी रूग्णवाहिकेला निधी उपलब्ध करून दिला होता. मलकापूर नगरपरिषदेने त्यावेळी तात्काळ रूग्णवाहिका खरेदी केली होती, मात्र कराड नगरपरिषदेने सबंधित निधीचा विनियोग अद्याप केलाच नव्हता.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like