औरंगाबाद | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता कोरोनाची रुग्णसंख्या सुद्धा कमी होत आहे. बुधवारी जिल्ह्यात 35 नव्या रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील 10, ग्रामीण भागातील 25 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 29 जणांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यातच आता कोरोना स्थिती आटोक्यात येईल अशी आशा आहे.
कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 806 एवढी झाली असून 1 लाख 43 हजार 38 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आणि 3,463 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 305 रुग्णांवर उपचार सुरू असून ग्रामीण भागातील 263 आणि शहरातील 42 रुग्णांचा समावेश आहे.
मनपा हद्दीतील 17 आणि ग्रामीण भागातील 12 अशा 29 कोरोनामुक्त रुग्णांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
औरंगाबादेत 1,ग्रामीण भागातील गंगापूर येथे 1,कन्नड येथे 2,वैजापूर 9 आणि पैठण येथील 8 रुग्ण आढळले आहे. मनपा हद्दीतील 10 आणि ग्रामीण भागातील 34 रुग्ण आढळले आहे. उपचार सुरु असताना चित्तेपिंपळगाव येथील 60 वर्षीय महिला, म्हस्की, वैजापूर येथील 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.