दिलासादायक ! देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, एकाच दिवसात 2,59,459 कोरोनामुक्त

corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशवासियांसाठी कोरोनाबाबत आता एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. नव्याने वाढ होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट झाल्याचे दिसून येत आहे. दररोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्ण संख्येचा नीचांकी आकडा आता समोर आला आहे. मागील 24 तासात देशात एक लाख 86 हजार 364 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे दोन लाख 59 हजार 459 रुग्ण कोरोनातून उपचार घेऊन त्याना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दररोज वाढ होणाऱ्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे भारतासाठी ही अत्यंत दिलासादायक अशी आकडेवारी मानली जात आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान मागील 24 तासात कोरोनामुळे 3660 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनारुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 75 लाख 55 हजार 457 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 2 कोटी 48 लाख 93 हजार410 इतकी झाली आहे. आतापर्यंत कोरोना मुळे तीन लाख 18 हजार 895 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे.

सध्या 23 लाख 43 हजार 152 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार केले जात आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सध्या पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींचा दुसरा आणि पहिला डोस प्रामुख्याने दिला जातो आहे. आतापर्यंत देशात 20 कोटी 57 लाख 20 हजार 660 नागरिकांना यशस्वीरित्या कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. याबाबतची आकडेवारी केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.