शस्त्राविना मावळ्यांच्या हिम्मतीवर लढणारा सरसेनापती ! राजू शेट्टींची प्रचार यंत्रणा ठरतेय पंढरपूर मतदारसंघात चर्चेचा विषय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या १० दिवसापासून पंढरपूर -मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणूकीचे बिगुल वाजले आहे. भाजप , राष्ट्रवादी काॅंग्रेस , स्वाभिमानी पक्ष , वंचित बहुजन आघाडी व अन्य अपक्षासह ११ उमेदवार निवडणूक लढवित आहे. भाजप व राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने गेल्या १० दिवसापासून प्रचार यंत्रणा गतिमान केली असून दोन्ही पक्षाचे राज्यातील दिग्गज नेते १० दिवसापासून पंढरपूर शहरातील गल्ली बोळ पिंजून काढत आहेत. दोन्ही पक्षांच्या भाऊगर्दीमुळे शहरातील पंचतारांकित हाॅटेल फुल्ल झाले असून पंढरपूर शहराला राजकीय जत्रेचे स्वरूप आले आहे. अलिशान गाड्या , नेतेमंडळीचे उच्च राहणीमान , बाहेरून प्रचारास आलेले पदाधिकारी यामुळे इतर निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत पंढरपूरातील मतदारांना वेगळेपण जाणवू लागले आहे.

या सर्व धामधूमीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी यांची प्रचार यंत्रणा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला असून एखादी लढाई लढत असताना हातामध्ये शस्त्र नसताना शत्रुशी दोन हात करणे व लढाई जिंकण्यासाठी मावळ्यांना गनिमा कावा शिकवून विरोधकांवर चढाई करण्याचे काम संघटनेचे कार्यकर्ते करत आहेत. प्रचारासाठी येताना घरातून शिदोरी बांधून येऊन भर उन्हा तान्हात वाडी वस्तीवर , शहरातील काॅलनीत , प्रभागात प्रचाराची यंत्रणा राबविली जात आहे. राज्यातील आलेले कार्येकर्ते मावळ मठात व भक्त निवासात मुक्कामला असून स्वखर्चाने प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे. स्वत: राजू शेटटी मावळ मठात दररोज कार्यकर्त्यांच्या सोबत जेवण करत असल्याने नेत्याच्या साधेपणामुळे कार्यकर्त्यांच्या प्रचारात उत्साह वाढत आहे. आर्थिक नियोजनात तारेवरची कसरत असूनसुध्दा लोकवर्गणीतून मिळालेल्या निधीतून प्रचार यंत्रणा राबविली जात आहे.

राजकीय लढाई करत असताना विरोधकांचे सैन्य हे दारूगोळा , अन्नधान्य व शस्त्रास्त्रासह सज्ज असूनही फक्त भरवशाच्या कार्यकर्त्यांच्या जिवावर राजकारणातील गनिमी कावे करत राजू शेटटी विरोधंकांशी दोन हात करत आहेत. गेल्या १५ दिवसात पंढरपूर व मंगळवेढा परिसरात निर्माण झालेल्या सुप्त लाटेमुळे कोणत्याच राजकीय पक्षांना मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे याचा अंदाज येईना.भालके व औताडे यांनी शेतकर्यांचे जवळपास ८६ कोटी एफ आर पी व कामगारांचे पगार थकीत असून व ऊसबिल मागणा-या शेतकर्यांना नंग्या तलवारी दाखवून त्यांनाच अटक करणे यामुळे उस उत्पादक शेतकर्यांमध्ये असंतोषाची लाट आहे. मंगळवेढा तालुक्यात दोन अवताडे बंधूत लागलेली लढत व दिड वर्षापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाधान अवताडे यांच्या अपक्ष उमेदवारीने प्रशांत परिचारकांचा पराभव झाल्याने व कदाचित अवताडे निवडून आले तर परिचारक गट संपेल या भितीने परिचारक गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले

Leave a Comment