हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या वाढत्या महागाईच्या काळात केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच, केंद्र सरकार सर्वसामान्यांना भारत ब्रँड अंतर्गत गव्हाचे पीठ, डाळीसह तांदूळ देखील सवलतीच्या दरात पुरवणार आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून तांदूळ 25 रुपये किलो दराने विकला जाणार आहे. खरे तर तांदळाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे.
तांदूळ नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (Nafed), नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन (NCCF) आणि केंद्रीय भंडार आउटलेट आणि मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून सर्वसामान्यांना 25 रुपये किलो दराने तांदूळ मिळणार आहे. मुख्य म्हणजे, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जीवन आवश्यक खाद्यपदार्थांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार 25 रुपये सवलतीच्या दराने भारत राइस सादर करणार आहे. ज्याचा फायदा देशातील नागरिकांना होईल.
दरम्यान, देशामध्ये तांदळाच्या किरकोळ किमतींमध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सध्या किरकोळ तांदळाचा सरासरी दर प्रति किलो 43 रुपयांवर आहे. जो मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी 14 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळेच सरकारकडून सर्वसामान्यांसाठी भारत राइस सादर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर सर्वसामान्यांना तांदूळ स्वस्त दरात उपलब्ध होईल.