हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याच्या दोन्ही सभागृहाचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्याविरोधात विलेपार्ले पोलीस स्थानकात तक्रार, राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे पदाधिकारी नितीन माने यांनी दिली तक्रार, सरकारी कामात व्यत्यय आणणे तसेच पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दमणच्या कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी गेले होते. त्यावेळी कंपनीने आम्हाला केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सर्व साठा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानुसार मी केंद्र सरकारशी बोलून परवानगी घेतली होती. त्यानंतर कंपनीने काही साठा महाराष्ट्रात पाठवलाही होता.
राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होता. राज्य सरकार त्यावेळी रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत होते. अशातच 12 एप्रिलला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे थेट दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना 50 हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते.