हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लवकरच आता मार्च महिना (March Month) संपून एप्रिल महिन्याला सुरुवात होईल. मार्च महिना संपला की 2023-24 हे आर्थिक वर्ष देखील संपेल. यानंतर 2024-25 आर्थिक वर्ष सुरू होईल. परंतु हे बदल होण्यापूर्वी 31 मार्च पर्यंत तुम्हाला इतर काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. ही कामे तुम्ही केली नाही तर याचा तुम्हाला आर्थिक फटका बसला.
GST रचना योजना
31 मार्च 2024 पर्यंत आर्थिक वर्ष 2024-25 साठी GST रचना योजनेसाठी GST करदाते अर्ज करू शकतात. परंतु फक्त ठराविक उलाढाल असलेले पात्रव्यवसायिकच या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना CMP-02 फॉर्म भरून द्यावा लागेल. यात ज्या जीएसटी करदात्यांची त्यांची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपये आहे तेच व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
कर वाचवण्यासाठी गुंतवणूक
येत्या एप्रिल महिन्यापासून आयकर रिटर्न भरण्याचा कालावधी सुरू होणार आहे. या तुम्ही जर आर्थिक वर्ष 2023-24 साठी कर प्रणालीत कर भरत असाल, तर तुम्ही गुंतवणुकीवर कर सवलतीचा दावा करू शकता. परंतु तुम्ही जर यापूर्वी कर बचत साधनांमध्ये गुंतवणूक केले नसेल तर तुम्हाला 31 मार्चपूर्वी त्यामध्ये गुंतवणूक करून कर वाचवता येऊ शकतो.
IRT फाइलिंग
येता 31 मार्च पर्यंत आयटीआर फायलिंग करदात्यांना अद्ययावत आयकर रिटर्न भरावे लागणार आहेत. तुम्ही FY 2020-21 (AY 2021-22) साठी अपडेट केलेले रिटर्न देऊ शकता. तसेच ज्या करतात त्यांनी आर्थिक वर्षाचे विवरणपत्र भरले नाही, उत्पादनाचा काही भाग दाखवू शकले नाहीत तसेच चुकीचा तपशील भरला आहे त्यांनी 31 मार्चपर्यंत आयकर पोर्टलवर जाऊन सर्व गोष्टी अपडेट करून घ्याव्यात.
FASTag KYC अपडेट
फास्टॅगचे केवायसी तपशील अपडेट करण्याची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत करण्यात आली आहे. यापूर्वी ती 29 फेब्रुवारी इतकीच होती. तुम्ही जर 31 मार्च पर्यंत फास्टॅगचे केवायसी तपशील अपडेट करून घेतले नाही तर तुमचे फास्टॅग खाते आणि डिव्हाइस 1 एप्रिलपासून अवैध ठरेल.
TDS दाखल करणे
येत्या 30 मार्च पर्यंत करदात्यांना चलन विवरण दाखल करावे लागणार आहे. या मार्च महिन्यात करदात्यांना जानेवारी 2024 मध्ये वेगवेगळ्या कलमांतर्गत मिळणाऱ्या कर सवलतीसाठी TDS दाखल करण्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. यात करदात्यांची कलम 194-IA, 194-IB आणि 194M अंतर्गत कर कपात करण्यात आली असेल तरच त्याना विवरण 30 मार्चपूर्वी दाखल करावे लागणार आहे.