कर्नाळा बँकेच्या संचालकांची जप्त मालमत्तांचा लिलाव करून पैसे देण्यात येणार – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून मालमत्तेच्या लिलावातून खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम परत केली जाऊ शकते , असे लेखी उत्तर सहकार मंत्री मा.नामदर बाळासाहेब पाटील यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले.

पनवेल तालुक्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदार व खातेदारांना तातडीने पैसे परत मिळण्याबाबत आ . प्रशांत ठाकूर , आ . महेश बालदी , आ . आशिष शेलार , आ . समीर कुणावार , आ . अमित साटम यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून शासनाचे लक्ष केंद्रित केले . कर्नाळा बँकेमध्ये ठेवीदार व खातेदारांच्या ठेवी २०१ ९ पासून बँकेतच अडकून पडल्या आहेत . संचालक मंडळाची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून लिलावाद्वारे ठेवीची रक्कम परत केली जाऊ शकते का , अशी विचारणा करून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे , असा सवालही आमदारांनी तारांकित प्रश्नाद्वारे केला .

या प्रश्नावर नामदार बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात , खातेदार व ठेवीदारांची रक्कम परत देण्यासाठी संचालक मंडळाची स्थावर , जंगम मालमत्ता जप्त करून मालमत्तेच्या लिलावातून ठेवी परत केल्या जाऊ शकतात , असे स्पष्ट केले . रिझर्व्ह बँकेने कर्नाळा बँकेच्या ५ ९ कर्ज प्रकरणांची तपासणी करण्याचे निर्देश सहकार आयुक्तांना दिले . त्याअनुषंगाने सहकार आयुक्तांनी जिल्हा विशेष लेखापरीक्षक , सहकारी संस्था , रायगडयांची नियुक्ती केली .

रिझर्व्ह बँकेने नमूद केलेली ५ कर्जप्रकरणे व जिल्हा विशेष लेखापरीक्षकांच्या तपासणीत आढळलेली इतर ४ अशा एकूण ६३ कर्जप्रकरणी ५१२ ५४ कोटी रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी सादर केला . अहवालाच्या अनुषंगाने बँकेचे कर्जदार व संचालक अशा एकूण ६३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत . गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा , सीआयडी , पुणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे . जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था रायगड – अलिबाग यांची बँकेच्या प्रशासकपदी नियुक्ती केली आहे . बँकेचे कर्जदार व संचालक अशा एकूण ६३ जणांविरुद्ध आर्थिक नुकसानाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे शहर यांची नियुक्ती केल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’