जळगाव शासकीय वसतिगृह प्रकरणी गृहमंत्र्यांची क्लीन चीट; तशी कोणतीही घटना घडलीच नाही

मुंबई । जळगाव येथील शासकीय वसतिगृहात पोलीस कर्मच्यानी महिलांना नग्न नृत्य करायला लावल्याची बातमीने खळबळ उडाली होती. विरोधी पक्षाने या घटनेवरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले होते. मात्र तशी कोणतीही घटना घडलीच नाही असं म्हणत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगाव शासकीय वसतिगृह प्रकरणी क्लीन चीट दिली आहे.

याप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी शासनाकडून महिला अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. सदर महिला अधिकाऱ्यांनी सादर कलेला अहवाल गृहमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवला आहे. यावेळी पोलीस अधिकारी महिला वसतिगृहात आत जाऊ शकत नाहीत असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

You might also like