मुंबई । डबल TDS (Double TDS) ची नवीन समस्या शेअरहोल्डर्ससमोर आली आहे. शेअर बाजारातील हजारो गुंतवणूकदार आणि वैयक्तिक करदात्यांनी सांगितले की,” त्यांना कंपन्यांकडून डिव्हीडंड आणि व्याज उत्पन्नाच्या नोटिसा मिळाल्या आहेत.”
परंतु त्यांनी यापूर्वीच टॅक्स रिटर्न फाइल फाईल केला आहे. पॅन आणि आधार कार्ड यांना त्यांच्या डीमॅट आणि बँक खात्यांशी जोडले आहे. नुकताच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने नवीन TDS नियमांनुसार सूचना जारी केल्या होत्या. नव्याने जारी केलेल्या नियमांचे पालन करूनही त्यांना डबल TCS नोटीस बजावण्यात आल्या आहेत, अशी शेअरहोल्डर्सची तक्रार आहे.
नवीन नियम
नुकताच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) परिपत्रकात असा इशारा दिला आहे की, जर करदात्याने रिटर्न भरले नाही किंवा त्याचा पॅन आणि आधार क्रमांक जोडला नसेल तर डबल TDS वजा केला जाईल. आवश्यकतेचे पालन कोणी केले हे तपासण्यासाठी CBDT ने एक डेटाबेस तयार केला आहे.
परंतु, हा डेटाबेस तपासण्याऐवजी कंपन्या शेअरहोल्डर्सना नवीन नियमांनुसार अनुपालन घोषणा (compliance declarations) दाखल करण्यास किंवा दुप्पट टॅक्स भरण्यास सांगत आहेत. TDS 5,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या इक्विटी होल्डिंगवर आणि फिक्स्ड डिपॉझिट्सवर मिळणारे व्याज यावर लागू आहे.
नवीन TDS दर दुप्पट झाला
बदललेल्या नियमांनुसार असे म्हटले होते की,” जर आपण यापूर्वी इनकम टॅक्स रिटर्न फाइल केला नसेल तर 1 जुलैपासून तुम्हाला जास्त टॅक्स एट सोर्स (TDS) भरावा लागेल. जी लोकं आयटी रिटर्न भरत नाहीत त्यांच्यासाठी नवीन TDS दर दुप्पट होईल. देय देण्यासाठी टॅक्स म्हणून एक भाग थेट वजा केला जातो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे केलेल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी हे केले जाते.
अधिक TDS कोणाला भरावे लागले?
आतापर्यत फक्त ज्यांच्याकडे पॅन नाही त्यांच्यासाठी अधिक TDS वजा करण्यात आले. परंतु आता जर तुम्ही टॅक्स रिटर्न भरला नसेल तर त्या बाबतीतही TDS वजा केला जाईल. पण इथे शेअरहोल्डर्ससमोर एक नवीन समस्या आली आहे. ज्यांनी आधार-पॅनला जोडले आहे आणि टॅक्स रिटर्न भरले आहेत त्यांनादेखील डबल TCS भरण्याची नोटीस मिळत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा