चर्चा तर होणार! किम जोंग यांना भारताकडून शुभेच्छा संदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर कोरियामधील भारतीय राजदूत अतुल एम गोतसर्वे यांची सध्या उत्तर कोरियामध्ये चर्चा सुरू आहे. भारतीय राजदूत गोतसुर्वे यांनी उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांना शुभेच्छा दिल्या होत्या. भारताने दिलेल्या शुभेच्छांना शासकीय वृत्तपत्रात आणि वृत्तवाहिन्यांमध्ये स्थान मिळाले. उत्तर कोरियात फार कमी वेळा अशाप्रकारची दखल घेतली जाते. त्यामुळे भारतीय राजदूताने दिलेल्या शुभेच्छांची चर्चा सुरू आहे.

किम जोंग उन यांनी आठ वर्षांपूर्वी मार्शल म्हणून पदभार स्विकारला होता. त्यानिमित्ताने भारतीय दूतावासाकडून किम यांना शुभेच्छा देणारे पत्र आणि पुष्पगुच्छ पाठवण्यात आला. त्याशिवाय किम यांना पुढील कारकीर्दीसाठी व चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उत्तर कोरियातील सरकारी वृत्तपत्र रोडोंग सिनमुनमध्ये या बातमीला प्रमुख स्थान देण्यात आले. हे वृत्तपत्र उत्तर कोरिया सरकारची अधिकृत भूमिका व्यक्त करत असतो. जगाच्या मुख्य प्रवाहापासून पोलादी भिंतीआड असणाऱ्या उत्तर कोरियात इतर देशांच्या या वृत्तांना फार कमी वेळा स्थान दिले जाते. भारताचे आणि उत्तर कोरियाचे संबंध चांगले आहेत. कोरियन देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोरियन युद्धादरम्यान भारताने दोन लाख २० हजार नागरिकांवर उपचार केले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.