हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडीवर; भाजपची सत्ता जाणार??

himachal pradesh election result
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवला असला तरी हिमाचल प्रदेशमध्ये मात्र भाजप पराभवाच्या छायेत आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेस आघाडीवर असून सत्तास्थापनेच्या अगदी जवळ आहे. मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये जास्त अंतर नसल्याने अजूनही धाकधुकी आहे. तर आम आदमी पार्टीला अद्याप भोपळा फोडता आलेला नाही.

आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, विधानसभेच्या ६८ जागा असलेल्या हिमाचल प्रदेशात काँग्रेस ३९, भाजप २६ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर ३ उमेदवार आघाडीवर आहेत. आम आदमी पक्षाला अजून खाते खोलता आलेलं नाही. हिमाचल प्रदेशात सत्तास्थापनेसाठी एकूण ३५ जागांची आवश्यकता आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 44 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला केवळ 21 जागांवर विजय मिळवता आला होता.

सध्या विचार केला तर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा आमदार आहे मात्र तरीही ऑपरेशन लोटसच्या भीतीने काँग्रेस आपल्या आमदारांना चंदीगडला घेऊन जाऊ शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, हिमाचलमध्ये 1985 नंतर कोणत्याच राजकीय पक्षाला निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळालेला नाही त्यामुळे आजचा निकाल पाहता हि परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे.