…म्हणून अशोक चव्हाणांनी मानले छत्रपती संभाजीराजेंचे आभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यांवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असताना भाजपचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी घेतलेली संयमी भूमिका आणि मराठा समाजाला केलेले आवाहन याबद्दल मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

मराठा आरक्षण लढ्यात खासदार संभाजी राजे यांनी नेहमीच सकारात्मक आणि राजकीय अभिनिवेष नसलेली भूमिका घेतली आहे. सामाजिक चळवळीत अशीच भूमिका ठेवून काम करणं गरजेचं असतं. त्याशिवाय चळवळीला यश मिळू शकत नाही. खासदार यांचे प्रयत्न आणि सहकार्यासाठी मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे, असं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

नक्की काय म्हणाले होते संभाजीराजे –

मराठा समाजासाठी हा दुर्दैवी दिवस आहे. सर्व सरकारांनी त्यांची बाजू मांडली आहे. मागील सरकारनं कायदा मंजूर केला. सगळ्यांनी आपली बाजू मांडली. शेवटी निकाल हा निकाल असतो, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिली होती. तसेच कोरोना संकट असताना कोणी उद्रेक हा शब्द पण काढू नका असे आवाहन त्यांनी केलं होतं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment