हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे इतिहासाच्या पदवीच्या अभ्यासक्रमातून भरत देशावर ज्यांनी आक्रमण केले आहे. त्या मुघलांचा इतिहास येथून पुढे अभ्यासक्रमात सहभागी करायचा नाही. आयोगाने घेतलेल्या या निर्णयावर आता राजकीय लोकांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज महत्वाचे ट्विट करीत मोदी सरकारवर टीका केली आहे. “मुघलांच्या इतिहासाबद्दल मोदी सरकारला अॅलर्जी असल्याचे सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयावर आज प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी मुघलांच्या इतिहासाला अभ्यासक्रमाच्या रद्दचा विषय सांगत मोदी सरकारवरही टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, इतिहास हा धर्म, जाती, चांगल्या वाईटाचा नसतो. ती मानवीय प्रवासातील घटनांची नोंद असते. भारताचा प्रवास अभ्यासाचा विषय असावा. मुघल किंवा इतर परकीय शासक हे अत्याचारीच होते हे दाखवून विशिष्ट समाजाप्रती द्वेष निर्माण होऊन राजकीय फायदा घेणे हा मोदी सरकारचा उद्देश आहे.
मुघलांच्या इतिहासाबद्दल मोदी सरकारला अॅलर्जी आहे त्यांच्याच घराण्यातील बहादुर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली १८५७ ची इंग्रजांविरुध्दचा लढा समस्त हिंदू राजे लढले त्यात नानासाहेब पेशवे ही होते. ज्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात तो मुघलांनी बांधला
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 15, 2021
मुघलांच्या इतिहासाबद्दल मोदी सरकारला अॅलर्जी आहे. त्यांच्याच घराण्यातील बहादुर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली १८५७ ची इंग्रजांविरुध्दचा लढा समस्त हिंदू राजे लढले त्यात नानासाहेब पेशवे ही होते. ज्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात तो मुघलांनी बांधला, असल्याचे दाखलेही यावेळी सावंत यांनी आपल्या ट्विटमधून देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.