Gujarat Election 2022 : काँग्रेसच्या 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Congress Sonia Gandhi Rahul Gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून पक्षबळकट करण्यास व आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यास हालचाली सुरु केली आहे. अशातच या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

काँग्रेस निवडणूक समितीची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली. या चर्चांनंतर काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पोरबंदरमधून अर्जुन मोधवाडिया आणि घाटलोडियामधून आणि याज्ञिक यांना संधी देण्यात आली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीची लढत सत्ताधारी भाजपा, विरोधी पक्ष कॉग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात अत्यंत चुरशीची होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा सत्तेत येण्यासाठी आणि ‘आप’ने भाजपाचा पराभव करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. मात्र, भाजपने आपल्या उमेदवारांच्या नावांची अद्यापपर्यंत घोषणा केलेली नाही. तर आम आदमी पक्षाने 100 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.