बंगरुळू | भाजपचे ऑरेशन लोटस भाजपने कर्नाटकात यशस्वी करून दाखवले असून कुमार स्वामी बहुमत सिद्ध करण्यास अयशस्वी ठरले आहेत. बहुमताचा आकडा असणाऱ्या १०५ या आकड्यावर जेडीएस आणि काँग्रेस सरकार गाठू शकले नाही. त्यामुळे कुमार स्वामी यांचे सरकार पडले आहे. १०५ विरोधात तर ९९ मते सरकारच्या बाजूने पडले त्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे हे सिद्ध झाल्याने कुमार स्वामी यांना राजीनामा द्यावा लागणार आहे.
आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा कार्यक्रम काँग्रेस आणि जेडीएस यांनी आमदारांच्या अपहरणा नंतर केले. या मधल्या काळात कुमार स्वामी यांनी भाजपची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. भाजप आमदार खरेदी करत आहे असा आरोप करून विधानसभेत मोठं मोठी भाषणे देत कुमार स्वामी यांनी आपली प्रतिमा जनतेमध्ये उंचावण्याचा प्रयत्न केला. तसेच विधानसभा अध्यक्षांना देखील कुमार स्वामी यांनी बहुमत चाचणी घेण्यापासून रोखले. अखेर आज विधानसभा अध्यक्षांनी बहुमत चाचणीचा निपटारा केला आहे.
एका उर्दू कवियत्रीने आपल्या प्रियकराला उद्देशून म्हणले होते की ‘तुम अगर मेरे घर नही आओगे , मे तुमारे पास घर को उठा लावुंगी’ अशीच अवस्था आज कर्नाटकात बघायला मिळाली आहे. तेथे हि भाजपने सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. पण सत्ता त्यांच्या जवळ आली नाही म्हणून त्यांनी सत्तेलाच आपल्या जवळ आणली आहे. कुमार स्वामी हे आता राजीनामा देतील आणि राज्यपाल सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण करतील एवढीच सत्तांतराची औचारिकता बाकी आहे. दरम्यान सरकारच्या विरोधात बहुमत गेल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी सभागृहात विजयाची निशाणी दाखवून जल्लोष केला.
हे पण वाचा –
मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार
लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत
या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !
आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!
म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो
ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट