अध्यक्षपदाच्या निवडीबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अधिवेशनातील चर्चेवेळी विरोधक व सत्ताधारी यांच्यात अनेक मुद्यांवरून खडाजंगी झाली. यावेळी अध्यक्ष पदाच्या निवडीच्या प्रक्रियेवरून सत्ताधारी व विरोधकांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे हे अधिवेशन हिवाळी ऐवजी वादळी होत असल्याचे दिसले. यावेळी काँग्रेस नेते तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अध्यक्ष पदाच्या निवडीबद्दल महत्वपूर्ण मागणी केली. अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी असे सुचविले आहे. खुल्या मतदानाने निवड प्रक्रिया व्हावी असा प्रस्ताव नियम समितीने पारित केला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

विधिमंडळाच्या अधिवेशनात अध्यक्ष निवडीवरून सत्ताधारी व विरोधकांच्यात खडाजंगी झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचा अहवाल सभागृहात मांडला. खुल्या मतदानाने निवड प्रक्रिया व्हावी असा प्रस्ताव मी मांडताच तो नियम समितीने पारित केला आहे. त्यानुसार विधिमंडळाचे अधिवेशन पाच दिवसाचे असल्याने एक दिवसात निर्णय द्यावा असे ठरवण्यात आले आहे.

https://www.youtube.com/watch?v=BA00tfyyqz8

विधिमंडळाचे अधिवेशन पाच दिवसाचे असल्याने एक दिवसात निर्णय देण्याबाबत उद्या निर्णय होईल. मात्र, यावेळी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मी मागणी करीत तसा पर्याय सुचविला आहे. तसेच परीक्षा घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशीही मी मागणी केली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

विधानसभेत पंतप्रधान मोदींवर ऊर्जामंत्र्यांनी केला हा गंभीर आरोप..फडणवीसांची तळपायाची आग केली मस्तकात

विरोधकांचा सभात्याग

विधिमंडळाच्या अधिवेशनात अध्यक्ष निवडीवरून घेतलेल्या निर्णयावरून विरोधकांनी सभात्याग केला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांनी अध्यक्ष निवडणुकीला व्हीप जारी करण्याचा निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे सरकार 10 दिवसांचा कालावधी एक दिवसावर का आणत आहे. सरकार भीतीपोटी हे सर्व करत आहे, असं फडणवीस म्हणाले. विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रिया संदर्भात आम्हांला हा निर्णय मान्य नाही त्यामुळे आम्ही सभात्याग करत आहोत.

Leave a Comment