नवी दिल्ली |लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभूत झाल्या नंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांच्या जागी कोणत्या नेत्याची वर्णी लावायची यावर पक्ष खलबते कुटत असतानाच मध्य प्रदेशातील कॉंग्रेस नेते अस्लम शेरखान यांनी आपल्याला कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदी बसवावे अशी मागणी राहुल गांधी यांना केली आहे.
आपण राष्ट्रीय अध्यक्ष पद सांभाळायला असमर्थ असाल तर त्या पदी माझी नियुक्ती करावी अशी मागणी अस्लम शेरखान यांनी केली आहे. वादग्रस्त वक्तव्य देण्यासाठी प्रसिद्ध असणारे अस्लम शेरखान हे मध्य प्रदेश कॉंग्रेस मधील मोठे नेते आहेत. काही वर्षे ते केंद्रात मंत्री देखील राहिले आहेत.
राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्यावर ठाम असून त्यांनी पक्षाला आपल्या जागी नव्या अध्यक्षाची नेमणूक करण्यासाठी सांगितले आहे. राहुल गांधी यांनी घेतलेल्या पवित्र्या नंतर राहुल गांधी किमान एक महिना अध्यक्ष पदावर कायम राहतील असे म्हणले आहे. मात्र कॉंग्रेसला १ महिन्याच्या मुदतीत नवा अध्यक्ष नेमणे गरजेचे राहणार आहे.