मॉर्निंग वॉकला गेलेल्या ‘या’ काँग्रेस नगरसेवकावर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला

chandrapur crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपुरमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काँग्रेसच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. बाईकवरून आलेल्या तीन अज्ञातांनी काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांना क्रिकेट बॅटने मारहाण केली. या हल्ल्यात नगरसेवक नंदू नागरकर हे जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय घडले नेमके ?
नंदू नागरकर यांची दैनंदिनी ज्ञात असल्याने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरकर यांच्यावर तीन युवकांनी हल्ला करत भरचौकात क्रिकेट बॅटने मारहाण केली. तोंडावर मास्क घातलेल्या या आरोपी युवकांनी आधी मुद्दाम गाडी आडवी घातली. मग अकारण भांडण उकरून काढत मराठी सिटी शाळा चौकात काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांना मारहाण केली.

या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. नंदू नागरकर हे काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष- माजी स्थायी सभापती आणि विद्यमान नगरसेवक आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या घटनेनंतर चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.