भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे मार्ग प्रकल्प रद्द केला; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराडपासून कोकणाला जोडणाऱ्या कराड-चिपळूण या नव्या रेल्वे मार्गाबाबत काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. “कराड-चिपळूण रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला भुमिपुजनपण केले. राज्य सरकारने 50 टक्के खर्च करायचे मान्य केले. पण भाजप ने समृद्धी महामार्गासाठी हा प्रकल्प रद्द केला,” असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट केले असून त्यातून त्यांनी कराड चिपळूण या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या रद्द होण्याबाबत महत्वाचे विधान केले आहे. चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “कराड-चिपळूण रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. शापूरजी पालनजी सोबत करार झाला. सुरेश प्रभू यांनी कराडला भुमिपुजन पण केले. राज्य सरकारने 50 टक्के खर्च करायचे मान्य केले. पण भाजप ने समृद्धी महामार्गासाठी हा प्रकल्प रद्द केला आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

कराड चिपळूण रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाबाबत सांगायचे झाले तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या कराड ते चिपळूण रेल्वे मार्गासाठी ऑगस्ट 2016 मध्ये महाराष्ट्र सरकारने करार केला होता. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कराड येथे करण्यात आले होते. स्थानिक आमदार बाळासाहेब पाटील व आनंदराव पाटील यांच्यासह अनेक कराडकरांनी प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहून या कामकाजात भाग घेतला. यानुसार शापुनजी पालनजी या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीकडे काम सोपविण्यात आले होते.

नेमका काय आहे हा प्रकल्प –

कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग १०३ कि.मी. लांबीचा असून, याचा प्रस्तावित खर्च 3,195.60 कोटी रुपये आहे. या मार्गावर कराडपासून खोडशी, सुपने, विहे, मल्हार पेठ, नाडे, पाटण, येराड, कोयना रोड ही ठिकाणे येणार होते. पुढे सह्याद्री पर्वतरागांच्या बोगद्यांतून हा मार्ग खेर्डी (चिपळूण) येथे कोकण रेल्वे मार्गाला हा मार्ग मिळणार होता. या मार्गामुळे कोकण व घाटमाथा रेल्वेने जोडण्यास मदत होणार असून प्रवाशी,व्यापारी किंवा उद्योग व्यावसायिकांना देशाच्या काना कोपऱ्यातील प्रवासासह मालवाहतूकीसाठीही मोठी मदत होणार होते.

असा होणार होता रेल्वेमार्ग –

1) लांबी १०३ किमी. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातून ३७ किमी, तर सातारा जिल्ह्यात ६६ किमीचा मार्ग.

2) कराड, चिपळूण, विहाले, मुंढे, कोयना रोड, पाटण, शेडगेवाडी, खोडशी ही रेल्वेस्थानके.

3) चिपळूण ते कराड हे आताचे रेल्वेचे अंतर ४२५ किमीने कमी होणार.

4) पर्यावरणाला हानी न पोहोचवता एकूण ४६ किमी लांबीचे अनेक बोगदे.

 

Leave a Comment