प्रियंका गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, केली ‘हि’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशातील उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्व वातावरण निर्माण झाले आहे. अशात लखीमपूरच्या घटनेवरुन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले आहे. “लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी भाजप पक्षाच्या राज्यमंत्र्यांचा मुलगा आहे. अशात आजच्या कार्यक्रमात राज्यमंत्री मिश्रा यांच्यासोबत तुम्ही कार्यक्रमात सहभागी होऊ नका, तत्काळ राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या, ही महत्वाची मागणीही यावेळी केली असल्याचे गांधी यांनी म्हंटले आहे.

लखीमपूरच्या घटनेवरून आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. तसेच माध्यमांशीही त्यांनी संवाद साधला. यावेळी गांधी म्हणाल्या की, मी देशाचे पंतप्रधान मोदींना तीन पानी पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी तुमच्या पक्षाच्या राज्यमंत्र्यांचा मुलगा असल्याची पंतप्रधान मोदी यांना आठवण करून दिली आहे.

अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राज्यमंत्र्यांसोबत वावरताना दिसत आहेत. लखीमपूर प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा. अजय मिश्रा अजूनही आपल्या मंत्रिमंडळात आहेत. आज उत्तर प्रदेशातील कार्यक्रमात राज्यमंत्री मिश्रा यांच्यासोबत पंतप्रधान मोदीजी तुम्ही सहभागी होऊ नका, तत्काळ राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी केली असल्याची माहिती गांधी यांनी केली आहे.

 

पंतप्रधान मोदीजी तुमच्या मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारले आहे. 600 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू, 350 पेक्षा अधिक दिवसांचा संघर्ष याठिकाणी पहायला मिळाला आहे. तुम्हाला कोणतीही चिंता नव्हती. तुमच्या पक्षातील नेत्यांनी शेतकऱ्यांचा अपमान करताना त्यांना दहशतवादी, देशद्रोही, गुंड, उपद्रवी म्हटलं होते. तुम्ही स्वत: आंदोलनजीवी या शब्दप्रयोगाचा वापर केला होता. त्यांच्यावर लाठीमार केला, अशी टीकाही गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

Leave a Comment