नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या देशातील विविध पत्रकार आणि विचारवंतांशी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करत आहेत. आज राहुल यांनी काही पत्रकारांसोबत व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारा संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवर टीका करत शेतकरी आणि कामगारांच्या थेट खात्यावर सरकारने पैसे पाठवावेत अशी मागणी केली. जेव्हा मुलाला दुखापत होते तेव्हा आई त्याला कर्ज देत नाही. पंतप्रधान मोदींनीही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवावेत असं म्हणत गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला.
आज आपल्या गरीब जनतेला पैशांची गरज आहे, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की त्यांनी या पॅकेजवर पुनर्विचार करावा. सरकारने मनरेगाच्या कामगारांना २०० दिवसांसाठीची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच शेतकऱ्यांनाहि कर्ज न देता त्यांना थेट आर्थिक सहाय्य करत त्यांच्या खात्यावर थेट रक्कम हस्तांतरित करावी असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. हे लोक आपले भविष्य आहेत असंही राहुल यांनी यावेळी म्हटले आहे.
Today our poor people need money, I am requesting Prime Minister Narendra Modi that he should reconsider this package. He should consider direct bank transfer, MGNREGA for 200 days & money to farmers directly, as these people are our future: Rahul Gandhi, Congress pic.twitter.com/hvTu5NDAdM
— ANI (@ANI) May 16, 2020
दरम्यान, रस्त्यावर येणाऱ्या परप्रांतीयांना कर्जाची गरज नसून पैशांची गरज आहे. तसेच कोरोनामुळे संकटात असलेल्या शेतकरी वर्गाला कर्जाची नव्हे तर पैशांची गरज आहे.मुलाला दुखापत होते तेव्हा आई त्याला कर्ज देत नाही तर ती त्याच्या पाठीशी उभी राहते. तेव्हा हे समजून घेऊन पंतप्रधान मोदींनी आपल्या पॅकेजवर पुनर्विचार करावा असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”