नवी दिल्ली । राजस्थानातील राजकीय संघर्षानंतर काँग्रेसनं भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींसह भाजपावर टीका करताना दिसत असून, काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते राजीव सातव यांनी एक शेर ट्विट करून पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.
वो भी शामिल था, ‘बहार-ए-वतन’ की लूट में,
फक़ीर बन के आया था वो, लाखों के सूट में ।
हा शेर ट्विट करून राजीव सातव यांनी मोदींवर टीका केली आहे. लाखो रुपयाच्या सूटमध्ये फकीर म्हणून आलेली व्यक्तीही देशाला लुटण्यामध्ये सहभागी होती, असा या शेरचा अर्थ असून, सातव यांनी यातून अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधला आहे.
वो भी शामिल था, 'बहार-ए-वतन' की लूट में,
फक़ीर बन के आया था वो, लाखों के सूट में ।
— MLC Dr.Pradnya Rajeev Satav (@SATAVRAJEEV) July 28, 2020
यापूर्वीही राजीव सातव यांनी मोदींवर चीनच्या मुद्यावरून टीका केली होती. “चीनसोबतच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मौन अंचबित करणार आहे. मोदीजी, ही मन की बात नसेल पण देशाची बात आहे. तुम्ही देशासमोर सत्य आणलं पाहिजे. मोदीजी, भारताच्या सीमेवर काय होत आहे, हे सगळं देशासमोर आणा,” असं राजीव सातव यांनी ट्विट करून म्हणाले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”