कुत्ते की मौत मरेगा; मोदींवर टीका करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली

Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ईडी च्या रडारावर असून देशभरातून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर उतरून मोदी सरकार विरोधात निषेध केला जात आहे. त्याच दरम्यान, नागपूर काँग्रेस नेते शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मृत्यू असा होईल की… कुत्ते की मौत होती है, वैसे ही नरेंद्र मोदीजी की मौत होगी…. असे ते बोलून गेलेत. आपल्या या विधानासाठी एखादी नोटीसही येईल, पण याची मला काही परवा नाही, असेही शेख हुसेन यावेळी आक्रमक भाषणा दरम्यान बोलून गेले.

https://twitter.com/MVAGovt/status/1536920435358572544?t=8V8IachZuQJ0BSn4RVuhdg&s=19

संपूर्ण महाराष्ट्र राहुल गांधींच्या मागे उभा आहे, त्यांना काही झाले तर हा देश अंगार होईल. हा देश उद्ध्वस्त होईल. देशाच्या विकासासाठी जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून निवडले आहे. काँग्रेसने 70 वर्षात जे केले त्याचे नाव विकून तुम्ही देश चालवत आहात अस त्यांनी म्हंटल.

दरम्यान, मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपने शेख हुसेन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. नागपूर येथील गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 294 आणि 504 आयपीसी अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शेख हुसेन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.