हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी भाजपनेत्या पंकजा मुंडे यांच्या भिन्न प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. यानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून काही पदाधिकाऱयांनी आपले राजीनामेही देण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील वरळी येथे निवासस्थानी समर्थकांनी गर्दी करीत राजीनामे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंकजा मुंडेंनी तो स्वीकारला नाही. यावरून काँग्रेसचे नेते विजय वड्डेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला असून टोलाही लगावला आहे.
पंकजा मुंडे यांनी आज समर्थकांचे राजिनामे न घेता त्यांना सल्ले दिले. यावर वड्डेट्टीवार म्हणाले कि, पंकजा मुंडे यांनी समर्थकांना बोलताना काही महत्वाची विधाने केली आहेत. त्यांनी समर्थकांना धीर देत राजीनामे न देण्याचा आदेश दिला आहे. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. त्याचबरोबर कौरव, पांडवाच्या युध्दाचाही मुंडे यांनी उल्लेख केला आहे. यावर वड्डेटीवार यांनी पंकजा मुंडेंना प्रश्न विचारला आहे की कौरव कोण पांडव कोण? हे पंकजा मुंडेंनी ठरवावे.
मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी समर्थकांना राजीनामा न देण्याचे आदेश दिले. तसेच आपली राजकीय भूमिकाही स्पष्ट केली. यावेळी त्यांनी म्हंटल आहे कि, पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा आदर करते, असं पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितले आहे.