35 वर्ष आमदार अन् 12 वर्ष मंत्री राहिलेल्या विलासराव पाटील उंडाळकरांनी मतदार संघात कामाचा पाऊस पाडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी सहकार मंत्री आणि तब्बल 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार राहिलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

विलासराव उंडाळकर नेहमी पुरोगामी विचारांसाठी ओळखले जायचे. त्यांनी सलग 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं. 2004 च्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होता.सहकार मंत्री म्हणून त्यांनी दमदार काम केलं होतं.

श्री. विलासकाका पाटील-उंडाळकर यांचा जन्म १५ जुलै १९३८ मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा लोकल बोर्ड, उंडाळे येथेच झाले. तर माध्यमिक शिक्षण टिळक हायस्कूल, कराड येथे झाले. तर राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथे त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. 1967 ते 1972 दरम्यान विलासकाका उंडाळकर जिल्हा परिषद सदस्य राहिले. येवडच नव्हे तर 1967 पासून ते आजअखेर ते सातारा जिल्हा मध्यवती बँकचे संचालक आहेत.

35 वर्ष आमदार अन् 12 वर्ष मंत्री राहिलेल्या विलासराव पाटील उंडाळकरांनी मतदार संघात कामाचा पाऊस पाडला

विलासराव पाटील उंडाळकर कराड दक्षिण मतदारसंघाचे १९८० ते २०१४ पर्यंत सलग ३५ वर्षे आमदार राहिले. यादरम्यान त्यांनी दुग्धविकास, पशुसंवर्धनमंत्री (१९९१ ते १९९३), विधी, न्याय व पुनर्वसनमंत्री (१९९९ ते २००३), सहकार व वस्त्रोद्योगमंत्री (२००३ ते २००४) अशी अनेक प्रकारची खाती सक्षमपणे सांभाळली.

महत्वकांकक्षी प्रकल्प –

1) १९७५ पासून उंडाळे येथे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन

2)समाजप्रबोधन मराठी साहित्य संमेलन

3) देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची निर्मिती

4)जलसिंचनाच्या माध्यमातून दक्षिण मांड सिंचन पॅटर्नची निर्मिती

ग्रामीण भागांचा विकास करताना विलास काकांनी अनेक संस्था विकसित करून सर्वसामान्याना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले.

विलासकाकांनी विकसित केलेल्या संस्था –

१. कोयना सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड, कराड

२. कराड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ लिमिटेड

३. शेती उत्पन्न बाजार समिती, कराड

स्थापन संस्था :

१. ग्रामीण विकास शिक्षण संस्था, उंडाळे
२. स्वा. सै. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, उंडाळे
३. कोयना सहकारी बँक लिमिटेड, कराड
४. रयत सहकारी साखर कारखाना लिमिटेड, शेवाळेवाडी. परिषदा
१. धर्मांध परिषद, मौजे तांबवे, ता. कराड.
२. शैक्षणिक चिंतन परिषद, कराड.
३. विज्ञान परिषद, कराड.
४. डोंगरी परिषद, काळगाव, ता. पाटण.
५. घटना बचाव परिषद, कराड.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment