इंडीयन आयडॉल 12’वर फिक्सिंगचा आरोप; अंजलीच्या एलिमिनेशनवर काँग्रेस आमदार अजय माकन नाराज

Anjali Gaikwad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इंडियन आयडॉल हा कधीकाळी अत्यंत लोकप्रिय असा सिंगिंग रिॲलिटी शो म्हणून ओळखला जायचा. मात्र या शोचे १२वे सीजन काय सुरू झाले, शोला ग्रहण च लागले आहे. गेल्या काही काळात शोमध्ये केल्या जाणाऱ्या काही पब्लिसिटी स्टंट मूळे शोच्या प्रतिमेची अत्यंत हानी झाली आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने नेटकरी सतत टीका करताना दिसत आहेत. यावेळी स्पर्धक अंजली गायकवाडच्या एलिमिनेशन मूळे इंडियन आयडॉल वर प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. यावेळी प्रेक्षकांमध्ये आमदाराचा देखील समावेश आहे. तिला फिक्सिंग करुन बाहेर काढले आहे, असा आरोप प्रेक्षकांनी केला आहे. तर अंजलीला पुन्हा शोमध्ये बोलवा अशा आशयाचे ट्विट काँग्रेसचे आमदार अजय माकन यांनी केल आहे.

“ही वेळ अत्यंत कठीण आहे. कधी कुठल्या फोनवरुन काय मेसेज येईल सांगता येणार नाही. काही तासांचा एक संगीत शो आपल्याला जुन्या काळात घेऊन जातोय. यापैकी कुठलाच स्पर्धक एलिमेनेट होण्यासाठी नाही आलाय. पण तरी देखील अंजली गायकवाडला परत बोलवा.” अशा आशयाचं ट्विट करुन अजय माकन यांनी शो मेकर्सला विनंती करीत तिच्या एलीमिनेशन बाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

https://www.instagram.com/p/CPu2wZtpHkV/?utm_source=ig_web_copy_link

गेल्या बऱ्याच दिवसात इंडियन आयडॉल १२ वर फिक्सिंग करण्याबाबत आरोप केले जात आहेत. शोचे माजी परिक्षक सोनू निगम आणि गायिका श्रेया घोषाल यांनीही इंडियन आयडॉल शो हा स्क्रिप्टेट असल्याचे म्हटले आहे. शिवाय शोमध्ये येणाऱ्या विशेष पाहुण्यांनी देखील पैसे घेऊन स्पर्धकांची स्तुती करायला सांगितले जाते असा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धक अंजली गायकवाड हीचे एलिमिनेशनदेखील शो मेकर्स कडून आधीच ठरले होते, असा आरोप संतापलेल्या प्रेक्षकांनी केला आहे. मात्र शोच्या निर्मात्यांनी अद्याप या आरोपांवर कुठलेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.