जेथे शेतकऱ्याचं ऐकलं जातं नाही तो देश खरंच प्रजासत्ताक आहे का ? प्रणिती शिंदेंचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर । सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मधील काँग्रेस भवन येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी सोलापूर शहर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, गेल्या ६२ दिवसांहून अधिक काळापासून दिल्लीच्या सिंघू सीमेवर हजारो शेतकरी मोदी सरकाराच्या दडपशाहीला विरोध करत ठाण मांडून बसले आहेत. यावर प्रणिती शिंदे यांनी भाष्य करताना, शेतकऱ्याचं ऐकलं जातं नाही तो देश खरंच प्रजासत्ताक आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्या म्हणाल्या कि, ”देशामध्ये शेतकरी आंदोलन सुरु आहे केंद्र सरकार जगाच्या पोशिंद्याला गांभीर्याने घेत नाही. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत मात्र सरकार त्यांच्या बाजूने बोलायला तैयार नाही किंवा त्यांच ऐकायला तैयार नाही. आता इतर राज्यासह महाराष्ट्राचे शेतकरी ही आता आंदोलनात सहभागी होत आहेत. परंतु केंद्र सरकार अन्नदाता शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेत नाहीये त्यामुळं आपला देश खरंच प्रजासत्ताक आहे का ?” असा सवाल आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

तर दुसरीकडे महिलांवर होणारे अत्याचार थांबत नाहीयेत. त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनी वचन घेऊन न ऐकणाऱ्या हुकूमशाही सरकारच्या विरोधात लढून पुन्हा एकदा लोकशाही प्रस्थापित करण्याचा निर्धार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’