हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तरुणांना सरकारी नोकरी मिळवायची असेल तर त्यांना लाच द्यावी लागते. आणि तरुणींना सरकारी नोकरीसाठी एखाद्यासोबत झोपावं लागतं,”असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे काँग्रेस आमदार प्रियांक खडगे यांनी केलं आहे. देशातील वाढत्या बेरोजगारी विरोधात भाजपवर टीका करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे, त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
राज्यात अनेक सरकारी पदभरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून राज्यातील भाजप सरकारनं पदांना विकण्याचा निर्णय घेतला आहे. तरुणींना सरकारी नोकरी हवी असेल तर त्यांना कुणाकडे तरी झोपावे लागते. सरकारी नोकरीसाठी पुरुषांना लाच द्यावी लागते. एका मंत्र्याने मुलीला नोकरीसाठी आपल्यासोबत झोपण्यास सांगितले होते. घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि त्याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड (KPTCL) ने सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियंता अशा एकूण 1,492 पदांची भरती केली आहे. त्याचवेळी पैसे घेऊन पद भरल्याचा आरोप त्यांनी केला . सहाय्यक अभियंता या पदासाठी 50 लाख तर कनिष्ठ अभियंता या पदासाठी 30 लाख रुपये घेण्यात आले. हा सर्व घोटाळा 300 कोटी रुपयांचा असावा असा अंदाज असल्याचे खडगे यांनी म्हटले आहे.