राहुल गांधींवर आक्षेपार्ह्य टिप्पणी केल्याप्रकरणी अर्थमंत्र्यांविरुद्ध विशेषाधिकार हनन नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात राहुल गांधी यांना ‘डूम्सडे मॅन’ म्हटल्याप्रकरणी विशेषाधिकार नोटीस देण्यात आलीय. राहुल गांधी भारताचे ‘डूम्सडे मॅन’ (प्रलयाची गोष्टी करणारा व्यक्ती) बनत आहेत, असं विधान सीतारमण यांनी केलं होतं. काँग्रेसचे लोकसभा सदस्य टी एन प्रतापन यांनी ही नोटीस दिलीय.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रतापन यांनीअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या या टिप्पणीवरून लोकसभा अध्यक्ष कार्यालयाला त्यांच्याविरोधात विशेषाधिकार हनन नोटीस सोपवली आहे. सीतारमण यांनी सदनातील एक सदस्य राहुल गांधी यांच्याविरुद्ध ‘डूम्सडे मॅन’ असल्याचा, भारताला तोडणाऱ्या तत्वांसोबत उभं राहण्याचा आणि देशाला कमजोर दाखवण्याचा आरोप केला आहे. त्या कोणत्या आधारावर या पद्धतीचे आरोप करत आहेत? असा प्रश्न प्रतापन यांनी आपल्या नोटिशीत विचारला आहे. सदनात या पद्धतीनं आरोप लावण्याचं चलन सुरू राहण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असंही प्रतापन यांनी आपल्या नोटिशीत म्हटलंय.

लोकसभेत मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध आरोप करणाऱ्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना अर्थमंत्री लोकसभेत उत्तर देत असताना त्यांनी ही टिप्पणी केली होती. ‘काँग्रेस नेते भ्रामक समजुती पसरवतात. देशाला तोडणाऱ्या ताकदींसोबत उभे राहतात आणि संविधानिक संस्थांचा अपमान करतात’ असा आरोप यावेळी निर्मला सीतारमण यांनी केला होता. यावेळी, कदाचित राहुल गांधी भारताचे ‘डूम्सडे मॅन’ बनत आहेत, असं विधान सीतारमण यांनी केलं होतं.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.