Ind vs Eng | विराट कोहलीचा खराब फॉर्म ठरतोय चिंतेचा विषय ; कसोटीमध्ये शून्यावर बाद होण्याची तब्बल 11 वी वेळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतक झळकावत अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला सुस्थितीत आणलं. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने रोहितला खंबीर साथ दिली. परंतु कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म ही भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. विराट कोहली आज शून्यावर बाद झाला. इंग्लंडच्या मोईन अलीने जबरदस्त चेंडू टाकून भारताच्या कर्णधाराला माघारी धाडले.

विराटची शून्यावर बाद होण्याची ही 26 वेळ ठरली. विराट एकूण 11 वेळा टेस्टमध्ये, 13 वेळा वनडे तर दोनदा शून्यावर आऊट झाला आहे.

विराट या सामन्यातील पहिल्या डावात 5 व्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. विराट पहिल्यांदाच पाचव्या चेंडूवर शून्यावर आऊट झाला आहे. आतापर्यंत विराट पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर प्रत्येकी 4वेळा आऊट झाला आहे. तर एकदा चौथ्या चेंडूवर आणि एकदा 11 चेंडूवर विराट भोपळा न फोडता माघारी परतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like