हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीच नि काँग्रेस यांनी महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली तरी भिन्न विचारधारा असलेल्या या तिन्ही पक्षातील अंतर्गत कुरघोडी नेहमीच समोर आल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना स्वबळावर लढण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिल्यानंतर नाना पाटोळे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना कामाला लागा असं सांगितलं. म्हणजे मी स्वबळावर लढण्याबाबत बोलत होतो तर त्रास होत होता आणि आता ते बोलले तर ते ठीक आहे, असे म्हणत जर समझोता करायचा नाही आणि सोबत राहून सुरा खुपसायचा असेल तर ते चालणार नाही. याबद्दल जो काही राग आपल्या मनात आहे ती एक ताकद बनली पाहिजे, असे आवाहन पटोले यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. पुण्याचे पालकमंत्री हे बारामतीकर आहेत. त्यांच्याकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे केली जात नाहीत. यात संपर्कमंत्र्यांनी लक्ष घालावं असं आपण म्हणतो पण शेवटी त्यांचं ऐकायचं की नाही हेसुद्धा तेच ठरवतात. कोणत्याही समित्यांवर नावे पाठवायची असतील तर तिथे संपर्कमंत्र्यांची नाही तर पालकमंत्र्यांची सही लागते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपली ताकद कशी वाढेल याकडे लक्ष केंद्रीत करा, असे आवाहन पटोले यांनी केले