काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला बेवकूफ बनवू नये; मुस्लिम आरक्षणावरून खासदार जलील आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – केंद्र सरकार जोपर्यंत आरक्षरणासाठीचा कोटा वाढवत नाही, तोपर्यंत मुस्लिम समाजाला आरक्षण देणे कठीण आहे, असे वक्तव्य राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले. मलिक यांच्या या वक्तव्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कडाडून टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आधी मुस्लिमांना बेवकूफ बनवणे सोडून द्यावे. सरकारने मनात आणलं तर एका दिवसात आरक्षण देऊ शकतात, पण त्यांची तशी नियतच नाही, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. यामुळे आता मुस्लिम आरक्षणावरून चांगलेच रणकंदन पेटले आहे.

नवाब मलिक यांनी आरक्षणातील अडचण सांगितल्यावर इम्तियाज जलील म्हणाले, ‘ सरकारने मनात आणलं तर मुस्लिम समाजाला एका दिवसात आरक्षण देऊ शकतात, मात्र आरक्षण देण्याची त्यांची नियत नाही. घटना दुरुस्ती चे कारण देऊन खोटे बोलत आहेत हे जेंव्हा विरोधी पक्षात होते आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्या म्हणून हे जोरजोरात ओरडत होते. त्या वेळेला त्यांना घटनादुरुस्तीचा अडथळा समजला नाही का? आम्ही दबाव निर्माण केल्यामुळे आरक्षण देण्यासंदर्भात या हालचाली निर्माण झालेल्या आहेत, या सरकारने तातडीने ऑर्डनन्स आणून हे आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिलाय.

तसेच मुस्लिम आरक्षणावरून मलिक यांनी केंद्राकडे बोट दाखवले यावर इम्तियाज जलील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना आम्ही मूर्ख आहोत, असं वाटतय की काय? 2014 मध्ये जेव्हा आरक्षणासंबंधी अध्यादेश आणला होता, तेव्हासुद्धा 50 टक्क्यांच्या मर्यादेचा नियम होताच. तेव्हा कसं शक्य होईल असं वाटलं, असा सवाल जलील यांनी केला.

Leave a Comment