काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित ; CWC बैठकीत निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे . कोरोनाच्या संकटामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली आहे. तसेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवावरही त्यांनी चिंता व्यक्त करताना या पराभवातून धडा घ्या, असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे.

पाच राज्यातील निवडणुकांमध्ये पक्षाच्या कामगिरीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षात मोठे फेरबदल होण्याची संकेत मिळत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांतर्गत बैठकांमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. २०१४ पासून काँग्रेसची कामगिरी खालावत असल्याची टीका होत आहे. काँग्रेसच्या २३ नेत्यांनी थेट गांधी घरण्याला आव्हान दिल्याने निवडणूक अटल आहे. त्यामुळे यंदा काँग्रेसचा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाण्याची शक्यता मावळली आहे.

यावेळी त्यांनी पाच राज्यांतील निवडणुकांमधील काँग्रेसच्या पराभवावरही भाष्य केलं. या पराभवातून काँग्रेसने धडा घेण्याची गरज आहे. असे निकाल का आले? हे जाणून घेतलं पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये आपल्याला एकही जागा मिळाली नाही हे आश्चर्यजनक आहे. या धक्कादायक निकालांची दखल घेतलीच पाहिजे. या निकालांची समीक्षा करण्यासाठी छोटी छोटी टीम तयार करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यावर पुढील दिशा ठरवता येईल, असं त्या म्हणाल्या.

यावेळी देशातील कोरोना साथीच्या गंभीर परिस्थितीबद्दल सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसंच केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment