ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण

Mohan Joshi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. दररोज मोठ्या प्रमाणात या व्हायरसचा संसर्ग वाढताना दिसतोय. दरम्यान या लाटेत मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आता हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मोहन जोशी यांनी स्वत:च याविषयी माहिती दिली आहे. मोहन जोशी यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतले आहेत. मात्र तरीही त्यांची गाठ कोरोनाशी पडलीच.

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी स्वतःला कोरोनाची लागण झाल्याची बातमी इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे. घरात राहा आणि सुरक्षित राहा… मी कोरोना पॉझिटीव्ह आहे, अशी इन्स्टास्टोरी त्यांनी शेअर केली आहे. सध्या ते स्वतःच्या घरी आयसोलेशनमध्ये आहेत, अशी माहिती मिळत आहे. मोहन जोशी सध्या झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अग्गंबाई सूनबाई’मध्ये आजोबांची भूमिका निभावत आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत गोव्यात या मालिकेचे थांबलेले शूटींग सुरु करण्यात आले होते. यामुळे मोहन जोशीही शूटींगसाठी गोव्यात गेले होते. मात्र गोव्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच एंटरटेनमेंट सोसायटी आॅफ गोवा यांनी राज्यात शूटींगसाठीची परवानगी नाकारली. यानंतर नुकतीच मालिकेची अख्खी टीम पुन्हा एकदा शूटिंग थांबवून मुंबईला परतली.

https://www.instagram.com/p/CJoaDqFJaVz/?utm_source=ig_web_copy_link

नाटक, चित्रपट आणि टिव्ही मालिका या तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाच्या जोरावर राज्य करणारे मोहन जोशी यांनी अनेक नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना अगदी लहानपणापासूनच अभिनय करण्याची आवड होती. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना नाटकात काम करण्याची परवानगी दिली.

https://www.instagram.com/p/B_SRlDFFaRE/?utm_source=ig_web_copy_link

पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय म्हणून ते किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागले. मात्र पुढे जेव्हा नोकरी का नाटक असा प्रश्न उभा राहिला. तेव्हा मोहन जोशी यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. पुढे त्यांनी अभिनयक्षेत्रात इतके नावलौकिक मिळवले कि आजही त्यांच्या भूमिका लोकांच्या लक्षात आहेत. त्यांचे अभिनयावरील प्रेम इतके अतोनात आहे कि आजच्या वयातही ते अजून अभिनय क्षेत्रात तितक्याच उत्साहाने कार्यरत आहेत.