प्रियंका गांधी दुर्गेचा अवतार, त्यांच्या हातूनच भाजपचा वध होणार ; कॉंग्रेस नेत्याचं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या दुर्गा मातेचा अवतार असून भाजपचा जो वध आहे तो प्रियंका गांधी यांच्या हातूनच होणार आहे,” असं काँग्रेसच्या तिकिटावर संभळमधून लोकसभा निवडणूक लढलेल्या आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटलं आहे.आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एक व्हीडिओ जारी केला आहे त्यात त्यांनी हे विधान केले आहे.

प्रियंका गांधी या सर्वात मोठ्या हिंदू आहेत. तसेच त्या दुर्गा मातेचा अवतार असून मंदिरात दर्शन करणं, प्रयागमध्ये स्नान करणं, हातांमध्ये रुद्राक्ष घालणं या त्यांच्या वैयक्तिक गोष्टी असल्याचं आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटलं आहे.

आचार्य प्रमोद कृष्णम हे प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावरून लोकसभेची निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. “ज्या प्रकारे प्रियंका गांधी या शाकुंभरी देवीचा आशीर्वाद घेत आहेत, संगममध्ये स्नान करत आहेत, त्यांच्या या मोहिमेमुळे भाजपची हवा गेली आहे. भाजपचा जो वध आहे तो प्रियंका गांधी यांच्या हातूनच होणार आहे,” असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like