अमित शाहांच्या ‘देखते हैं’चा अर्थ उद्धव ठाकरेंनी ‘हो’ असा घेतला – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या वादावरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद वाढला आणि शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस- राष्ट्रवादी बरोबर आघाडी करून राज्यात महाविकास आघाडीची स्थापना केली. परंतु मुख्यमंत्री पदाबाबत कोणी कोणाला फसवलं याबाबत मात्र शिवसेना आणि भाजप मधील आरोप प्रत्यारोपाच सत्र काही थांबत नाही. भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते म्हणत असले तरी भाजप कडून मात्र या आरोपाचं खंडन केलं जातं आहे.

त्यामुळे त्या बंद दाराआडच्या चर्चेत नेमकं काय घडलं? कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं? हे राज्यातील सर्वसामान्य मतदारांना समजणं शक्यच नाही. अशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी त्या बंद दाराआडच्या चर्चेचा उद्धव ठाकरे यांनी कसा चुकीचा अर्थ घेतला, हे सांगलीत सांगितलं आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाह यांनी ‘देखते हैं’ असं म्हटलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी त्याचा अर्थ ‘हो’ असा घेतल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय. सांगली महापौर निवडीचा संदर्भ देत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. आता मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेत चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणेच काही झालं असेल का? असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ शकतो.

अमित शाह काय म्हणाले?

अमित शाह यांनी कणकवली येथील कार्यक्रमात आपण उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले नव्हते, असा खुलासा केला. तुम्ही म्हणता की मी बंद खोलीत वचन दिले. मात्र मी बंद खोलीत कधीही वचन देत नसतो, तर खुलेआम वचन देतो अस अमित शहा म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like