हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात खर तर 2014 लाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी शक्य झाली असती पण तेव्हा काँग्रेसने इच्छा दाखवली नाही अस मोठं विधान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. ही झालेली चूक आम्ही २०१९ ला सुधारली असून राज्यातील आघाडी सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२०१४ साली काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि राज्यात सरकार बनवण्याबाबत चर्चा केली. मात्र, यात काँग्रेसने इच्छा दाखवली नाही. परिणामी, भाजपा सत्तेत येताच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. फडणवीस सरकारच्या काळात विरोधकांना संपवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. भाजपाच्या पाच वर्षाच्या सत्ता काळातील राजकीय सूडाचा अनुभव घेतल्यानंतर २०१९ सत्ता स्थापनेची आलेली संधी दोन्ही कॉंग्रेसने साधली.”
राजकीय विरोधाला न जुमानता, फडणवीस सरकारच्या काळात राजकीय विरोधापुरते मर्यादित न राहता त्यांची राजकीय कारकीर्द संपवण्याचे प्रयत्न झाले. विरोधकांना पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची नवी परंपरा या काळात सुरू झाली आहे. विरोधकांना नेस्तनाबूत करण्याची नवी परंपरा या काळात सुरू झाली.भारतील लोकशाहीच्या दृष्टीने हा बाब गंभीर होती. या साऱ्यांचा विचार करून २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात शिवसेनेसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.