केंद्र सरकार सर्वसामान्यांच्यावर कर लादून स्वतःची झोळी भरत आहे; इंधन दरवाढीवरून पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

देशातील केंद्र सरकारने सरकारी कंपन्या, मालमत्ता विकून सरकार चालेल आहे. देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झालेले आहे. देश चालवण्यात सरकारचे अक्षम्य चूक झाली आहे त्यामुळे आता सामान्य माणसावर पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीचा बोजा टाकलेला आहे त्यामुळे त्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली

कराड येथे पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीविरोधात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती यावेळी कोल्हापूर नाका, दत्त चौक ते पोपटभाई पेट्रोल पंप या मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी अँड. उदयसिंह पाटील, शिवराज मोरे, नगराध्यक्षा नीलम येडगे, नगरसेवक आप्पा माने, इंद्रजीत गुजर, जाकिर पठाण, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 23 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली गेलेले आहेत यामध्ये मोदी हटाव देश बचाव असा नारा आम्ही सायकल रॅली च्या द्वारे देत आहोत. मनमोहनसिंग यांचे सरकार असताना 124 रुपये प्रति डॉलर मागे कच्च्या तेलाचे दर होते सध्या कच्च्या तेलाचे दर 60 ते 65 प्रती बॅरल मागे असतानाही पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ आहे केंद्र सरकार सामान्य लोकांच्या वरती कर लादून स्वतःच्या जोळ्या भरण्याचे काम करत आहे त्याचा आम्ही निषेध करतो.