हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातुलनेने अपुरी पडणारी आरोग्य सुविधा याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी एक ट्विट करत
पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील समानता दाखवली आहे.
PMCares के वेंटिलेटर और स्वयं PM में कई समानताएँ हैं-
– दोनों का हद से ज़्यादा झूठा प्रचार
– दोनों ही अपना काम करने में फ़ेल
– ज़रूरत के समय, दोनों को ढूँढना मुश्किल।— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 17, 2021
राहुल गांधी म्हणाले, ‘पीएमकेअरचे व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान यांच्यात अनेक समानता आहेत. हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात – हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरतात आणि विशेष म्हणजे दोघांनाही सापडणे कठीण आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये केंद्राकडून व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले होते. मात्र, काही सुटे भाग न आल्यामुळे हे व्हेंटिलेटर्स पडून होते. या मुद्द्यावरून भाजपा आणि सत्ताधारी महाविकासआघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना आता काँग्रेसकडून या एकूणच व्हेंटिलेटर पुरवठा प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप केला होता.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.