हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत असतात. राहुल गांधी सतत ट्विट करत केंद्रावर कडक शब्दांत टीका करत असतात.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला होता. लसींचा पुरेसा स्टॉक नसल्याचं माहीत असतानाच केंद्राने लसीकरण मोहीम सुरू केली. शिवाय 45 आणि नंतर 18 वर्षांवरील व्यक्तिंनाही लस देण्याची घोषणा केली. केंद्राकडे कोणतंही नियोजन नव्हतं. असं जाधव यांनी म्हटलं होतं. जाधव यांच्या या वक्तव्याची बातमी राहुल यांनी ट्विटमध्ये शेअर करत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.
एक तर महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी’, असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. या ट्विट सोबत त्यांनी सुरेश जाधव यांच्या केंद्रावरील आरोपाचा संदर्भ जोडला आहे.
एक तो महामारी,
उस पर प्रधान अहंकारी! pic.twitter.com/fO0GzXBpvL— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 23, 2021
दरम्यान, राहुल यांची केंद्रावर टीका सुरूच आहे. चार दिवसांपूर्वीही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. केंद्रातील मोदी सरकारने कोरोना महामारी रोखण्यासाठी रणनीती तयार केली आहे. त्यावर राहुल गांधी यांनी सातत्याने प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत.