Friday, June 9, 2023

विराट, रोहित आणि धोनीचं एका शब्दात वर्णन; सुर्यकुमार यादवची बेधडक उत्तरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादव गेल्या काही वर्षातील आपल्या दमदार कामगिरीमुळे प्रकाशझोकात आला आहे. आयपीएल मधेही सूर्यकुमार खोर्‍याने धावा करत असून हळूहळू आपलं स्थान तो भारतीय क्रिकेट संघात निर्माण करत आहे. दरम्यान, एका लाईव्ह सेशनदरम्यान सूर्यकुमार केवळ एका शब्दात भारतीय क्रिकेटपटूंची वर्णन करायला सांगितले. तेव्हा सुर्यकुमारने बेधडकपणे उत्तरे दिली.

एका फॅन्सने सूर्यकुमार यादवला सचिन तेंडुलकरचं एका शब्दात वर्णन करायला सांगितलं. यावेळी सूर्यकुमार यादवने ‘क्रिकेटचा देव’ असं उत्तर दिलं. एका फॅन्स ने त्याला यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीबद्दल जेव्हा त्याला विचारलं गेलं तेव्हा त्याच्यासमोर एक शब्द आला तो होता लिजेंड्री… एका फॅन्सने विराट कोहलीबद्दल एका शब्दात विचारलं तर सूर्यकुमार यादव म्हणाला ‘प्रेरणादायक…

यानंतर भारताचा तसंच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याच्याबद्दलही सूर्यकुमार यादवला विचारलं असता सुर्यकुमारने उत्तर दिलं ‘हिटमॅन’…दरम्यान, सुर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये 108 मॅचमध्ये 2197 धावा ठोकल्या आहेत. मुंबई इंडिअन्स चा एक नवा आधारस्तंभ म्हणून सुर्यकुमार उदयास येत आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.